Free Flour Mill Yojana

Free Flour Mill Yojana

 

मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहूया.

 

1) या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.

 

2) गरीब आणि गरजू महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

 

3) या योजनेचा लाभ 18 ते साठ वयोगटातील मुली व महिलांना घेता येणार आहे.

 

4) अर्ज करणारी महिला किंवा मुलगी बारावी शिकलेली असावी.

 

5) अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारांपेक्षा कमी असावे.

 

 

तर या प्रकारची पात्रता मध्ये बसणाऱ्या सर्व महिला किंवा मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते पाहूया.

 

1) अर्जाचा विहित नमुना

 

2)शिक्षणासंबंधीत प्रमाणपत्र

 

3) व्यवसायासाठी जागेचा उतारा

 

3) उत्पन्नाचा दाखला( तहसीलदार किंवा तलाठी यांचा)

 

4) आधार कार्ड झेरॉक्स

 

5)बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स

 

6)रहिवासी दाखला

 

7)आणि विज बिल

 

या योजनेचा अर्ज कसा व कोठे करावा ते पाहूया.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागतो. विहित नमुना (prescribed pattern)हा पूर्णपणे भरून घ्यायचा आहे.आणि त्याच्यासोबत सांगितलेली जी कागदपत्रे आहेत ते जोडायचे आहेत.

 

हा अर्ज भरून झाल्याच्या नंतर आणि कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील गट विकास अधिकारी(Group Development Officer) , पंचायत समिती कार्यालयात जमा करायचा आहे. आणि हा अर्ज जमा केल्या नंतर जेवढे अर्ज जमा होतील.

 

आणि या अर्जासोबत ज्यांची कागदपत्रे योग्य आणि बरोबर असतील, अशा महिला लाभार्थ्यांची निवड महिला व बालविकास समिती(Women and Child Development Committee) द्वारा केली जाईल.आणि लाभ मंजूर झाल्याचे लाभार्थ्यांना कळविण्यात येईल.

 

तर अशाप्रकारे महिला या मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Close Help dada

Close Help dada